मुंबई : कोरोना व्हायरस संदर्भात यापुढे सर्व माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाची व्हॉट्सअपवर माहिती देण्यासाठी व्हाट्सअप चॅट बॉट हे तंत्रज्ञान विकसीत केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जग हैराण आहे. त्यामुळे अनेकांच्या या आजाराविषयी व्यवस्थित माहिती नाही. मात्र, आता एका क्लिकवर तुम्हाला ही माहिती मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबद्दल दिलीत.


यापुढे कोरोना संदर्भाक सर्व माहिती तुमच्या हातातील मोबाईलवर मिळणार आहे. +912026127394 या नंबरवर राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना बाबतची माहिती मिळणार आहे. सध्या इंग्रजी भाषेत ही माहिती मिळेल. मात्र, लवकरच ही माहिती मराठीत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी अजित घाबरुन जाऊ नये. आपल्याकडे पुरेसा अन्यधान्याचा साठा आहे. जीवनावश्यक गोष्टी कुठल्याही बंद राहणार नाही. फक्त सरकारच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यानी केलं.

परभणीच्या रँचोकडून पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसीत; आपत्कालीन परिस्थितीत होणार मदत

अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र, जीवनावश्यक गोष्टीही सर्व सुरुच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. मात्र, हे संकट गंभीर आहे. त्यामुळे घरातचं बसा. मी वारंवार सांगतोय घरामध्ये बसा. कारण, जसं मोदी यांनी सांगितले तसं बाहेर पडलो तर संकट घरात येईल. हाच आपल्याला या रोगातून बाहेर पडण्याचा उपाय आहे. या संकटाला घराबाहेरुनच माघारी पाठवायचं आहे. त्यामुळे सर्वांना घरातच बसण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं.

Coronavirus | मुंबईत चार तर सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 116 वर

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीत समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 116 वर पोहचला आहे.

CM Uddhav Thackeray PC | घरातच राहा, फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडू नका : उद्धव ठाकरे