मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला 22 लाखांची लाच घेताना अटक
वाईन शॉप मालकाविरोधात दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी पोलीस अधिकाऱ्याने केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम 22 लाख रुपये ठरली.

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लाचखोर पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. तब्बल 22 लाखांची लाच घेताना एसीबीने पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. आनंद भोईर असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.
आनंद भोईरला वाईन शॉप मालकाकडून 22 लाखांची लाच स्वीकारताना ही अटक झाली आहे. भोईर अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 मध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे.
आनंद भोईर दारुजप्तीच्या एका प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून काम पाहत होता. याप्रकरणी काही आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. तर वाईन शॉप मालकाविरोधात दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी भोईरने केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम 22 लाख रुपये ठरली.
वाईन शॉप मालकाने एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने प्रकरणाची शहनिशा करुन सापळा रचला. सापळ्यादरम्यान खाजगी वाहनात आनंद भोईरला 22 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली .
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप






















