मुंबई : पुण्यातील पूजा खेडकर (Pooja Khedkar)  प्रकरणानंतर मुंबई पोलिस (Mumbai Police)  अॅक्शन मोडवर आलेत.मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे आता काढायला सुरुवात झालीये. तसंच ते दिवे काढून त्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यास सुरुवात झालीये. दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि तरीही जर गाडीवरती दिवा लावला असेल तर मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.  


मुंबई पोलीसांची ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे.   दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि तरीही जर गाडीवरती दिवा लावला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई  होणार आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच विशेष पथक आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सचिवांपर्यंत सर्वच गाड्यांवरचे दिवे काढायला सुरुवात केली आहे. 


परवानगी नसणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता


केंद्र सरकारनं व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी लाल दिव्याला हद्दपार केलं आहे. मात्र काही अधिकाऱ्यांना हे दिवा लावण्याची परवानगी आहे. परंतु मंत्रालय परिसरातील अनेक वाहनांवर अंबक दिवे, महाराष्ट्र शासन असे लिहिले आहे. ते दिवे काढायला सुरूवात केले आहे.  सध्या सर्वांचे दिवे काढण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे दिवे काढले त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. ज्यांच्याकडे परवानगी आहे, त्यांना त्यांचे दिवे परत देण्यात येणार आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांकडे परवानगी नसताना त्यांनी दिवे लावले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. 


व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी 2017 साली भाजप सरकारने घेतला निर्णय


2017 सालापासून मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवा आजपासून इतिहासजमा  झाला आहेत. केंद्र सकरानं व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी गाडीवर लाल दिवा न लावण्याचा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक सेवांकराता निळा दिवा वापला जाईल. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त निळा दिवा वापरण्यात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिवे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या गाड्यांना निळा दिवा असणार आहे. लाल दिव्याबाबत असणारी 108 नंबरची तरतूद काढण्यात आली आहे.


Video : गाडीवरील लाल दिव्यावर करडी नजर; परवानगी नसेल तर होणार कारवाई 



हे ही वाचा :


फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको; मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्याला झोडपलं