Maharashtra Politics मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेली ईडब्लूएस (EWS) बाबतची मागणी ही अतिशय रास्त असून आम्ही देखील सातत्याने ही मागणी योग्य असल्याचे बोलत आले आहोत. आज मनोज जरांगे यांनी पुनरुच्चार करून ही मागणी लावून धरली आहे, या मागणीला आमचा देखील पाठिंबा आहे. खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीमुळेच मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) खीळ बसली. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच न्यायालयात मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं.


उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मराठा समाजासोबत राजकीय खेळ केला. मात्र त्याला पर्याय म्हणून ईडब्ल्यूएस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये सरकार आल्याआल्या  त्यांनी ही मागणी लावून धरली. त्याचा फायदा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना झाला आहे. नोकरीमध्ये हजारो विद्यार्थी आणि तरुणांना त्याचा उपयोग झाला आहे. आज मनोज जरांगे यांनी पुनरुच्चार करून ही मागणी चे समर्थन केल्याने एक प्रकारे सरकारचे त्यांनी कौतुकच केले आहे. त्यासाठी त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो. असे म्हणत भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे यांचे आभार मानले आहे. 


मविआमुळेच मराठा आरक्षणाला खीळ बसली- प्रसाद लाड  


राज्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून  एक लाख तरुणांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. महिलांच्या शिक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती, ती चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे निघाली आहे. सरकार म्हणून आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी आहोत. काही लोक राजकारणाच्या आड समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सत्य तपासून घ्यावं, असही प्रसाद लाड म्हणाले.


कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार- मनोज जरांगे


राज्यातील मराठा आरक्षण प्रश्न आता चांगलाच तापला असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा, असं म्हणत सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायचं असा आवाहन त्यांनी केलंय. दरम्यान राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारलेलं दिसतंय. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे असं ते म्हणालेत. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. 


आणखी वाचा


"शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो," मतांचं गणित मांडत प्रकाश आंबेडकर यांचं मोठे विधान!