Mumbai Police Corona Update : राज्यातील अनेक नेतेमंडळींना कोरोनानं गाठल्यानंतर मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. मुंबईकरांसाठी ऑन ड्यूटी 24 तास असलेल्या पोलिसांनाही आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एकूण 18 बड्या अधिकाऱ्यांना  कोरोनाची लागण झाली आहे. 


मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. 


कोरोनाची लागण झालेले बडे पोलिस अधिकारी
1 सह पोलिस आयुक्त ( जॉइंट सीपी )
विश्वास नागरे पाटिल 


4 अतिरिक्त पोलिस आयुक्त ( अडिशनल सीपी )
संदीप कार्णिक 
सत्यनारायण चौधरी 
अतुल पाटील 
दिलीप सावंत 


13 पोलिस उपायुक्त ( डिसीपी ).
एन . हरीबालाजी 
गीता चौहान 
सोमनाथ घारगे 
दत्ता नलावडे 
प्रकाश जाधव 
नितिन पवार 
सुनील भारद्वाज 
एन अम्बिका 
विशाल ठाकूर 
नियती ठाकर 
बालकृष्ण यादव 
विजय पाटील 
मंजूनाथ सिंगे


 
गेल्या 48 तासात 114 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना 
गेल्या 48 तासात मुंबई पोलीस दलातील 114 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत एकूण 125 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 



महत्त्वाच्या इतर बातम्या :