मुंबई : लॉकडॉनमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पण अर्धशतक पार केलेला हा चोर स्वतःला आवरू शकला नाही आणि लॉकडाऊनच्या काळातही यांनी चोऱ्या सुरूच ठेवलं. 2 जुलै रोजी कांदिवली रेल्वे स्टेशनच्या जवळ हारून सरदार याने एका वाईन शॉपमधील तिजोरी आणि लाखो रुपयांचं सामान घेऊन पसार झाला. आपण पकडले जाऊ नये म्हणून सिनेमाच्या स्टाईलमध्ये या चोराने सर्व  सामान मालवणीच्या एका पाण्याने भरलेला तलावात लपवलं.


हारून सरदार हे या चोराच नाव असून मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये याच्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हारून सरदार हा सराईत गुन्हेगार असून याच्या तीन पत्न्या आहेत. या तिघींना मालाडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हारूनने ठेवलं  असून, चोरी हाच हारूणचा धंदा आहे. एखाद्या कर्मठ व्यापार सारखंच हारुण या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रीय आहे.  म्हणूनच  मुंबई मध्येच त्याच्यावर 50 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत.

2 जुलैच्या रात्री कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका वाईन शॉप मध्ये हारुण चोरी करण्यास शिरला. दुकानांमधील तिजोरी दारू आणि लाखो रुपयांचा सामान घेऊन हारुण पसार झाला. चोर इतका हुशार होता की दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही ची डीव्हीआर मशीन (या मशीन मध्ये सीसीटीव्ही मधील फुटेज स्टोर होते) स्वतः सोबत घेऊन गेला ज्याच्यामुळे तो पकडला जाऊ नये.

मात्र पोलिसांच्या तपासामध्ये सर्व चित्र स्पष्ट झालं आणि रस्त्यांवर लागलेल्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी हारूणला आणि त्याने चोरी केलेल्या समानाला शोधून काढलं. पोलीस या प्रकरणांमध्ये हारून सरदारवर मुंबईमध्ये अजून कुठे गुन्हे दाखल आहेत का आणि कुठल्या इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.

मात्र हारूण सरदारच्या चोरी करण्याच्या पद्धतीने आणि त्याच्या चोरीच्या आकड्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.