मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री बिंदू यांची बहीण निती नानुभाई देसाई यांच्या अकाऊंटमधून 2 लाख 14 हजार 875 रुपये भामट्याने लंपास केले आहेत. 14 जून रोजी नीती यांना एक फोन आला ज्यामध्ये पेटीएम ऑफिसमधून बोलत असल्याचं भासवून त्यांच्या अकाऊंट संबंधित माहिती घेऊन रक्कम गायब करण्यात आली. यानंतर नीती यांनी ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.


नीती देसाई या वरळीला राहात असून त्या जेट एअरवेज मध्ये कामाला होत्या. एचएसबीसी बँकेत त्यांचे अकाउंट होते. फेब्रुवारी 2015 निती देसाई यांनी एच एस बी सी बँकेचे क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्याची वैधता 2021 पर्यंत आहे. क्रेडिट कार्डने नीती देसाई या आपल्या दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करण्यासाठी करत होत्या. तसेच इतर नेहमीच्या कामांकरिता सुद्धा या क्रेडिट कार्डचा वापर त्या करत होत्या. या कार्ड बरोबरच इतर ऑनलाईन पेमेंटच्या अॅप्लिकेशन सुद्धा निधी देसाई या वापरतात. ज्यामध्ये पेटीएम, गुगल पे , अमेझॉन, नायका इत्यादी ॲप्लिकेशनचा समावेश आहे.

14 जून रोजी नीती देसाई हे ताडदेव येथे रहात असलेल्या त्यांची बहीण हर्षा देसाई यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी, दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला ज्यामध्ये त्यांच्या पेटीएम ॲपचे खात्याचे केवायसीची वैधता संपली असून ते अपडेट करण्यासाठी पेटीएम ऑफिस नंबर 8617034396 या क्रमांकावर फोन करण्यासाठी सांगण्यात आले होते. नीती देसाई यांनी त्या नंबर वर फोन केला आणि ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यास त्यांची काही हरकत नसल्याचं सांगितलं.

फोन केल्यावर त्यांना पेटीएम डॉट कॉम वर सेंटर वरून त्यावर पेटीएमचे पासवर्ड टाकून त्यांच्या पेटीएम वॉलेट मधील त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून दहा रुपये रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले जेणेकरून केवायसी लगेच अपडेट होईल. दहा रुपये ट्रान्सफर केल्यावर निती देसाई यांना कॉल होल्डवर ठेवण्यास सांगितले आणि 1 तासाच्या वर त्यांना होल्ड वर ठेवलं, त्यानंतर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे व्हाट्सअप वर पाठवण्यास सांगण्यात आलं. निती देसाई यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा पाठवलं. त्यानंतर या भामट्यांनी त्यांच्या पेटीएम वर दोन हजार रुपये पाठवले आणि परत काढून घेतले. ज्यानंतर निती देसाई यांना संशय आला आणि त्याने लगेच त्यांचा मेल चेक केला आणि त्यांना धक्काच बसला.

एकूण 9 वेळा ट्रांजेक्शन करून नीती देसाई यांच्या अकाउंट मधून 2 लाख 14 हजार 875 रुपये काढण्यात आले होते. यानंतर याची तक्रार निती देसाई यांनी मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.