मुंबई : मुंबई पोलिसांसाठी  (Mumbai Police) आनंदाची बातमी आहे.  मुंबई पोलिस दलातील 90 पोलीस हवालदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर 113  पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना  पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिली आहे.


 मुंबई पोलीस दलातील 90 पोलिस हवालदारांची पोलिस उप निरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.  लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत ही पदोन्नती करण्यात आल्याने निवडणूक आयोगाला  देखील या संदर्भात महिती देण्यात आली आहे. सर्व  90 पोलीस हवालदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर गुणवत्तेने व सेवाजेष्ठतेने पदोन्नती देण्यात आली आहे. 


आदेशाचा भंग होणार नाही 


बुधवारी बदल्या करण्यात आलेल्यांनी बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.


पोलिसांमुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप 


राज्यातील पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना दिवसरात्र एक करून कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची दखल घेत सेवा द्यावी लागते. राज्यात शांतता आणि कायद्याचं वातावरण राहावं यासाठी ही यंत्रणा अविरतपणे कार्य करत नागरिकांच्या हिताची काळजी घेत असते. याच पोलिसांमुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसतो. अशा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


मुंबई पोलिसांंच्या सर्व सुट्ट्या रद्द


महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले. यानंतर पाचव्या टप्प्यासाठी  20 मे ला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गृह खात्याने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.   मुंबईत 20 मे रोजी मतदान होईल. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती आहे.


हे ही वाचा :


Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरण, अनुज थापन मृत्यू तपास तातडीने CBI कडे सोपवण्यास हायकोर्टाचा नकार