मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं वाढती रुग्णसंख्या पाहता, राज्यासह मुंबईतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. पण, या परिस्थितही आपण जितके बेड उपलब्ध करायचे आहेत त्या आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी बेड उपलब्ध केले आहेत. त्या बेड प्रमाणे लिक्विड ऑक्सिजनची सोयही उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 


ऑक्सिजन अभावी रुग्ण दगवला तर त्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे ही बाब स्पष्ट करत, सध्याच्या परिस्थितीला ऑक्सिजनचा सिलिंडरचा पुरवठा होत नाही आहे, ज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्या म्हणाल्या. रुग्णांना हँडी ऑक्सिजन देखील उपलब्ध करत आहोत असंही त्या म्हणाल्या. ऑक्सिजन कमी राहिला आहे हे लक्षात येताच आपण सर्व रुग्ण इतरत्र हलवले आहेत, या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. 


मागील 3 दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु 10 टक्के लोक अजूनही बाहेर फिरत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली. बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर मध्ये रुगांची संख्या वाढली तसं आम्ही लगेचच रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे असं म्हणत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासन कंत्राटदारांच्या संपर्कात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. 


मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामं वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना 


ऑक्सिजनचा तुटवडा आणि कोरोनाचा हाहाकार पाहता महापौर किशोरी पेडणेकर या आवश्यक ठिकाणांवर पाहणीसाठी जात परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.


कुंभ मेळ्यातून परतणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचं 


कुंभ मेळ्यात मागील काही दिवसांत धडकी भरवणारी गर्दी पाहायला मिळाली. मुख्य म्हणजे या गर्दीत कोरोना आणखी फोफोवला आणि हजारो नवे कोरोनाबाधित तिथं आढळून आले. याच पार्श्वभूमीवर कुंभ मेळ्यातून रेल्वे आणि बसने परतणाऱ्या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असून, यासाठीचा खर्च हा त्या व्यक्तींनाच करायचा आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.