एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ, अनुप डांगे प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई : पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमवीर सिंह यांच्यावर मुंबईतील पब मालकाशी संबंध आणि अंडरवर्ल्डशी नात असल्याचे आरोप लावले होते. आता  त्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जलद गतीने तपास होण्यासाठी हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. 

 या प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडून केली जात होती.  मात्र वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू असून सुद्धा काही निकाल न लागल्यामुळे अनुप डांगे यांनी  या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.  मात्र आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण ?

गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पोलिस निरीक्षक अनुप संभाजी डांगे यांची त्यावेळी गावदेवी पोलिस ठाण्यातून दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात त्यांची बदली करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी जीतू नवलानी याला आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर परमबीस सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी डांगे यांनी त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता, असा आरोप पत्रात केला होता. 

या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. तसेच सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2 फेब्रुवारी, 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे. 

त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात सीआयडीचा तपास कुठच्या दिशेने जातो आहे आणि त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत कितपत वाढ होते ते पाहणे  महत्त्वाचे असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget