एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सहा धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. रात्री परिसरात भूकंपाचे सहा धक्के बसल्याची माहिती आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना कोरोनासोबत भूकंपाच्या सावटाखाली जगावं लागत आहे. या परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

रात्रभरात सहा भूकंपाचे धक्के रात्री 3 वाजून 29 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 3 वाजून 43 मिनिटांनी 2.8 रीश्टर स्केल, 3 वाजून 45 मिनिटांनी 2.6 रीश्टर स्केल, 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 5 वाजून 4 मिनिटांनी 2.2 रीश्टर स्केल, 6 वाजता 4.2 रीश्टर स्केल,7 वाजून 6 मिनिटांनी 4.2 रीश्टर स्केल अशा तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

काल रात्री आणि आज पहाटे पुन्हा सहा भूकंपाचे धक्के बसले आहेत. मध्यरात्री जवळपास सौम्य व मध्यम स्वरूपाचे पाच धक्के बसल्याची नागरिकांनी माहिती दिलीय. तलासरी, धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, कासा, बोर्डी, दापचरी, धानिवरी, आंबोली, चिंचणी आणि आजूबाजूचा परिसर भूकंपानं हादरला आहे.

या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात 7 तारखेला डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का बसला होता.

सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल

2019 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल 1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल 7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल 13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल 20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल 1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल 9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल 10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल 31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल 2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल 9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल 15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल 12 मे - 2.6 रिश्टर स्केल 10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल 20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल 24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल 25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल 31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल 13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल 21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल 20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल 21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल 2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल 24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल 26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल 18 नोव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल 21 नोव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल 13 डिसेंबर- दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून सलग 2.8, 3.1, 2.9 असे सलग 3 धक्के बसले, रात्री 9.21 वाजता 3.7 रिश्टर स्केल 14 डिसेंबर पहाटे - 5.22 वाजता 3.8 रिश्टर स्केल

2020 31 जानेवारी 2020 - 3.3 रिश्टर स्केल 19.मार्च 2020 - 3.3 रिश्टर स्केल 1 एप्रिल 2020 - 3.0 रिश्टर स्केल 6 एप्रिल2020 - रात्री 12.18 वाजता 3 .1 रिश्टर स्केल 17 जून 2020 - सकाळी 11.51 वाजता 2.5 रिश्टर स्केल 4 सप्टेंबर 2020 - 10 वाजून 33 मिनिटं 2.8 रिश्टर स्केल, 11 वाजून 41 मिनिटं 4.0 रिश्टर स्केल, 12 वाजून 05 मिनिटं 3.6 रिश्टर स्केल

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Embed widget