एक्स्प्लोर

डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, कोरोनासोबत दुहेरी संकटाने नागरिक भयभीत

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले आहे. कोरोनासोबत भूकंपाचे दुहेरी संकटाचं सावट नागरिकांवर आहे.भूकंपामुळं भयभीत नागरिक रात्री घराबाहेर पडले. तलासरी पोलिसांकडून गावागावात पाहणी सुरू आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. काल रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8, 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 तर 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 असे रिश्टर स्केलचे धक्के बसले. डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचे जवळपास सात ते आठ हादरे बसले. हे धक्के तलासरी,आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, दापचरी, आंबोली, धानीवरी, ओसारविरा, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, शिशने परिसरात जाणवले.

तलासरी पोलीस सध्या गावागावात गस्त घालत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करून पाहणी करत आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना भूकंपाने काहीसा दिलासा दिला होता. मात्र आज पुन्हा भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली आले आहेत.

पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल 2019 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल 1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल 7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल 13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल 20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल 1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल 9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल 10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल 31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल 2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल 9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल 15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल 12 मे - 2.6 रिश्टर स्केल 10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल 20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल 24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल 25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल 31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल 13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल 21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल 20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल 21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल 2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल 24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल 26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल 18 नोव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल 21 नोव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल 13 डिसेंबर- दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून सलग 2.8, 3.1, 2.9 असे सलग 3 धक्के बसले, रात्री 9.21 वाजता 3.7 रिश्टर स्केल 14 डिसेंबर पहाटे - 5.22 वाजता 3.8 रिश्टर स्केल

31 जानेवारी 2020 - 3.3 रिश्टर स्केल 19.मार्च 2020 - 3.3 रिश्टर स्केल 1 एप्रिल 2020 - 3.0 रिश्टर स्केल 6 एप्रिल2020 - रात्री 12.18 वाजता 3 .1 रिश्टर स्केल 17 जून 2020 -  सकाळी 11.51 वाजता 2.5 रिश्टर स्केल

4 सप्टेंबर 2020 - 10 वाजून 33 मिनिटं 2.8 रिश्टर स्केल, 11 वाजून 41 मिनिटं 4.0 रिश्टर स्केल, 12 वाजून 05 मिनिटं 3.6 रिश्टर स्केल

संबंधित बातम्या

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यशJaved Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 27 February 2025Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश, गुनाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना साथ
मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
Embed widget