एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी
अंगावर झाड कोसळून मृत्यू होण्याची ही मुंबईतील पहिली घटना नाही. याआधी सात जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईत मरण किती स्वस्त झालंय याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. मालाडमध्ये अंगावर झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर आज सकाळी ही घटना घडली.
शैलेश राठोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शैलेश राठोड आज सकाळी सहाच्या सुमारास नारियलवाला कॉलनीजवळ झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला तर आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खरंतर मुंबईला वायू वादळाचा तडाखा बसला नाही, परंतु त्याचा परिणाम जाणवला. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून सुरु असलेला पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडाचं नुकसान झालं आहे. त्यातून आज मालाडमध्ये झाडाची फांदी अंगावर पडल्याने एकाला जीव गमवावा लागला.
दरम्यान, अंगावर झाड कोसळून मृत्यू होण्याची ही मुंबईतील पहिली घटना नाही. याआधी सात जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
झाड पडून मृत्यू झालेल्या घटना
* 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू
* 23 जुलै 2017 - किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू
* 7 डिसेंबर 2017 - शारदा घोडेस्वार - डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू
* 19 एप्रिल 2018 - दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू
* 29 मे 2018 - वाळकेश्वरमध्ये सुखी लीलाजी यांचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू
* 24 जून 2018 - मेट्रो सिनेमाजवळ अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू, चार जखमी
* 24 जुलै 2018 - मुलुंडमध्ये रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू
* 14 जून 2019 - मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड यांचा मृत्यू
संबंधित बातम्या
मुंबईत झाडाची फांदी अंगावर पडून महिलेचा मृत्यू
मुंबई पालिकेच्या हलगर्जीमुळे दूरदर्शनच्या माजी निवेदिकेचा बळी?
ठाण्यात अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement