मुंबई : पेट्रोल दराच्या बाबतीत महाराष्ट्र आता महा'ग'राष्ट्र ठरलं आहे. कारण सध्याच्या घडीला देशात सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात विकलं जात आहे
कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलर-रुपये एक्सचेंज दर पाहता तेल कंपन्या 29.54 रुपये प्रति लिटर दराने विक्री करतात. परंतु सरकार त्यात आणखी 48 रुपयांचा कर जोडून पेट्रोलची विक्री करतं. मुंबईतील ग्राहकांना सगळ्या करांसह पेट्रोलसाठी 77.50 रुपये मोजावे लागतात. याचाच अर्थ ग्राहक पेट्रोलवर 153 टक्के टॅक्स भरतात. ग्राहक तब्बल 47.96 रुपये पेट्रोलवर कर म्हणून देतात. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्याचा व्हॅट, जकात, सेस आणि पेट्रोल पंप मालकांचं कमिशन असा मिळून 153 टक्के कर पेट्रोलवर आकारला जातो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. राज्य सरकारने व्हॅट लागू केला असला तरी 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यावेळी सर्व कर रद्द होणं अपेक्षित आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कर रचना

पेट्रोल दर (रुपयांमध्ये)

तेल कंपन्यांकडून रिफायनरींना दिली जाणारी रक्कम

26.86

तेल कंपन्यांचे मार्केटिंग चार्जेस

2.68

केंद्रीय उत्पादन शुल्क

21.48

मुंबई जकात कर

1.10

वाहतूक खर्च

0.20

एकूण

52.32

वरील एकूण किंमतीवर राज्यातील व्हॅट आणि सेस

22.60

वितरकांचं कमिशन

2.58

मुंबईतील पेट्रोलचे दर

77.50

दिल्लीतील पेट्रोलचे दर

68.26

संबंधित बातम्या

इंधनात महा'ग'राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महाग ‘लवकरच पेट्रोल, डिझेल घरपोच मिळणार’, पेट्रोलियम मंत्र्यांची ट्विटरद्वारे माहिती