मोटरमन मालाड स्टेशन विसरला, लोकल थेट कांदिवलीला
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2017 09:18 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
NEXT PREV
मुंबई : मुंबईत काल लोकलने चर्चगेटहून कांदिवलीला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. कारण स्लो लोकल असूनही मोटरमनने मालाडला लोकल थांबवलीच नाही आणि लोकल थेट कांदिवलीला पोहोचली. त्यामुळे शंभरहून अधिक प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. मात्र आपण लोकल थांबवण्याचं विसरल्याची कबुली मोटरमन जगदीश परमार यांनी दिली आहे. मोटरमन आणि गार्डला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चर्चगेटहून काल सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी सुटलेली लोकल मालाडला 11 वाजून 33 मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित होतं.