मुंबई :  मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ (Mankhurd Railway Station) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. पुतण्याच्या मृत्युचा धक्का सहन झाल्याने काकाने देखील आत्महत्या केली आहे.  चेंबूर आणि गोवंडी दरम्यान त्यांनी आत्महत्या केली आहे. 


आयुष राजेश शेगोकार असे या सहा वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून आयुष राजेश शेगोकार या सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आयुष ज्या चुलत्याकडे राहत होता, त्या शैलेश शेगोकारने ही लोकल ट्रेन खाली उडी घेऊन काल संध्याकाळी आत्महत्या केली आहे.चेंबूर आणि गोवंडीच्या रेल्वे ट्रॅकवर त्यांनी आत्महत्या केली आहे. 


चिमुकला खेळताना खड्ड्यात पडला


मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आयुष राजेश शेगोकार असे या दुर्देवी मृत्यू पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.आज सकाळी तो त्याच्या घरापासून जवळ मानखुर्द रेल्वे स्थानक लगत असलेल्या आणि पाण्यानी भरलेल्या खड्ड्याजवळ मित्रांसह खेळायला गेला होता.अचानक तो खड्डात पडला आणि बुडाला.या वेळी मानखुर्द रेल्वे स्थानकात उभ्या प्रवाश्यांनी हे दृश्य बघितले आणि त्या खड्ड्याकडे धाव घेतली.  गर्दी झाल्यानंतर  लोहमार्ग पोलिस देखील तिथे दाखल झाले.त्यांनी तत्काळ खड्ड्यात बुडालेल्या आयुषला बाहेर काढले आणि पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


लोहमार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल 


या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 


लहान मुलांकडे लक्ष द्या


 सध्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे.  अनेकजण नोकरी, व्यवसाय सांभाळत असल्याने अनेकदा लहान मुलांकडे दुर्लक्ष होते. या माध्यमातून अशा घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे लहान मुले खेळण्याच्या बहाण्याने कोणत्याही वस्तूला पटकन हातात घेत असतात, कधी एखादी धारदार वस्तू हातात घेऊन खेळत असतात. तर कधी रस्त्यावर, बाहेर जाऊन खेळात असतात. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची संभावना असते. अशा घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते.


हे ही वाचा :


आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदामध्ये मी स्पीडब्रेकर होतो असा ठाकरेंचा समज होता, त्यामुळेच त्यांनी घाई केली : एकनाथ शिंदे