Platform Ticket: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून वाढवण्यात आलेले प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर पूर्ववत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. याशिवाय रेल्वे प्लॅटफॉर्मवर विमानास्क फिरणाऱ्या नागिरकांकडून 500 रुपयांचा दंडही वसूल केला जात होता. दरम्यान, मुंबईतील कोरोबाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्यानं टप्प्याटप्प्यानं कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.


करोना काळात मेल/एक्स्प्रेस गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवर अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात पाच पटीनं वाढ करण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिट दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले होते. आज मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात सीएसएमटी, एलटीटी आणि अन्य चार रेल्वे स्थानकांचा आहे. 


“कोरोना साथीच्या आजारामुळं लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांकडून सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दर उद्यापासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून 50 रुपयांवरून 10 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय" मध्य रेल्वेने अशी अधिसूचना काढलेली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-