ST Workers Strike Live : एसटीच्या आंदोलनावर रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उद्या अंतिम निर्णय होणार

ST Strike Workers : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. पाहा यासंबंधीचे प्रत्येक अपडेट्स...

abp majha web team Last Updated: 24 Nov 2021 07:48 PM
एसटीच्या आंदोलनावर रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उद्या अंतिम निर्णय होणार

एसटीच्या आंदोलनावर आज कुठलाही ठोस निर्णय होणार नाही. आज रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उद्या अंतिम निर्णय होणार आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  रात्री आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असून  आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, परिवहन मंत्री अनिल परब

1 ते 20 वर्ष पूर्ण झालेल्यांच्या मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांची वेतनवाढ होणार आहे. 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेल्यांचं मूळ वेतन 17 हजार 300 होणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना इतर भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार, परिवहन मंत्री अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार आहेत.

समितीचा अहवाल आल्यावर विलिनीकरणाचा निर्णय घेऊ,परिवहन मंत्री अनिल परब

गेल्या चौदा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा निर्णय राज्य सरकारला मान्य आहे. समितीचा अहवाल आल्यावर विलिनीकरणाचा निर्णय घेऊ.  

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला  600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्याचे सरकारचे पाऊल. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे. 

अजित पवारांच्या भेटीनंतर अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत आज ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाले आहेत.

चर्चेची पहिली फेरी संपली, सरकार आणि एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु

चर्चेची पहिली फेरी संपली आहे. पहिल्या फेरीत झालेल्या प्रस्तावावर आता ST कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ प्रतिनिधी स्वतंत्रपणे चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा संपल्यावर पुन्हा दुसऱ्या फेरीत चर्चा सुरू होईल. चर्चा सकारात्मक असल्याची माहिती.

परिवहन मंत्र्यासोबत बैठक सुरू, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसह आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर उपस्थित

परिवहन मंत्र्यासोबत बैठक सुरू, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसह आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर उपस्थित

कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला. गेल्या 17 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे... खेड्यापाड्यात जाणारी लालपरी एका जागेवर थांबून आहे...त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शाळा, महाविद्यालये या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे...आता कुठे राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहेत...तोपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे... त्यामुळे अद्याप ही शाळा असेल किंवा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पोहोचले नाहीत..अशावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून एसटीची सेवा पूर्ववत करावी, यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी आज कोल्हापूर बसस्थानक याठिकाणी आंदोलन केलं...सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली...आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या अशी मागणी देखील केली.

आंदोलक एसटी कर्मचारी प्रतिनिधी सह्याद्रीवर बैठकीसाठी उपस्थित

एसटी संपामध्ये मागील पंधरा दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करणारे एसटी कर्मचारी प्रतिनिधी हे सह्याद्रीवर बैठकीसाठी आले 

सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांना कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर रोखलं 

सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांना कर्मचाऱ्यांनी परत आणलं, आझाद मैदानावर रोखलं, तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तुम्हीच आमच्या आंदोलनाचे नेतृत्व करा असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ हे अकरा वाजता परिवहन मंत्र्यांसोबत बैठकीसाठी जाणार आहे

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता : ABP Majha

Sadabhau Khot on ST Workers Strike : आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं : सदाभाऊ खोत ABP Majha

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे. 

काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा

ST Strike Workers : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिली आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजत आहे. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी 10 वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु असंही खोत यांनी म्हटलं आहे. तसंच शिष्टमंडळाशी चर्चा करुन सरकारसोबतच्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही खोत यांनी दिली आहे.  

पार्श्वभूमी

पगारवाढीचा 'गिअर', संपाला 'ब्रेक'? विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे. 

बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सांगितलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही पडळकर यांनी सांगितलं आहे. तसेच, आम्ही पोटतिडकीनं आमची बाजू मांडली. राज्यातील निलंबित झालेला कर्मचारी आहे, तो आझाद मैदान येथे येणार आहे. आज सरकारनं विलनिकरण करणाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलं. 

पाहा व्हिडीओ : आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं : सदाभाऊ खोत

कालच्या बैठकीनंतर काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब? 

जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल, तो राज्य सरकारला मान्य असेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन वाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन, संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.