मुंबई : चेंबूर वाशीनाका येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात विषारी नागिणीच्या 18 पिलांचा जन्म झाला आहे. सर्पमित्र अमान खान याने चेंबूर मधील एका गरोदर नागिणीची सुटका केली होती. त्यावेळी घटनास्थळी ही नागीण अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आली होती, तिला हालचाल करणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे अमान याने या नागिणीला काही वेळाकरीता आपल्या चेंबूर येथील घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.


घरी नेताच त्या नागिणीने 18 अंडी दिली. यावेळी नागीण अत्यंत अशक्त असल्यामुळे तिला उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र अमान याने तिची 18 अंडी घरातच कृत्रिमरित्ता उबवली. गेल्या आठवड्यातच त्या अंड्यांमधून 18 पिल्ले बाहेर आली. या सर्व पिलांची प्रकृती सुदृढ होती. यावेळी अमान याने वनविभागला याची माहिती दिली. त्यानंतर या 18 पिल्लांना सुखरुपपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे
सर्प हा माणसाचा मित्र आहे. तो स्वत:हून कधीच इजा पोहोचवत नाही. सापाच्या विषापासून प्रतिविष तयार केलं जातं. विषारी साप नष्ट झाले तर अशी औषधे कशापासून तयार करायची ही समस्या उभी राहील. ही बाब लक्षात घेऊन सापांना जीवदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.


साप दिसल्यास काय करावे? 
साप दिसल्यास त्वरीत 1926  हॅलो फॅारेस्ट या क्रमांकावर संपर्क करावा किंवा फायरब्रिगेड व स्थानिक सर्पमित्रांना संपर्क करावे.


महत्वाच्या बातम्या :