मुंबई : भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर 16 वर्षाच्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. आपल्याला मोबाईल गेम खेळू दिलं जात नाही या रागातून तिने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. (16 years old girl dies by consuming rat poison  after quarrel with brother over mobile game).


शुक्रवारी रात्री संबंधित मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन मोठा वाद झाला होता. कुंटुंबाची परिस्थिती जेमतेमच असल्याने त्यांच्याकडे एकच मोबाईल होता. तिच्या भावाने त्या मुलीला मोबाईल न दिल्याने राग अनावर होऊन तिने उंदीर मारण्याचे औषधं प्यायले. त्या मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि उपचार सुरु केले. पण दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या मुलीचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तो मृतदेह कुटुंबाच्या हवाली करण्यात आला.






समंथा नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे यांनी सांगितलं की, "ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली आहे. संबंधित मुलीचा तिच्या लहान भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यामुळे रागीट स्वभावाच्या या मुलीने जवळच्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं आणि ते लहान भावासमोरच प्यायली. त्यानंतर लहान भावाने आपल्या आई-वडिलांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्या मुलीला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचार सुरु असताना या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आणखी पोलीस तपास सुरु आहे."


महत्वाच्या बातम्या :