नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट परिसरात खळबळजनक घटना समोर आली आहे. पुरूषाच्या मृतदेहाचे तुकडे मिळाल्याने पोलीस चक्रावले आहेत. निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये शरीरापासून वेगळे केलेले हात, पाय आढळून आले आहेत तर शरीर आणि शीर गायब आहे. तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले आहे. 

Continues below advertisement


आढळून आलेला मृतदेह 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


एपीएमसी परिसरात गटारीत असलेल्या एका निळ्या पिशवीत सकाळपासून दुर्गंध येत होता. सुरुवातीला ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दुर्लक्ष केलं. मात्र, हा दुर्गंध नकोसा झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पिशवी उघडली. त्यावेळी संबंधित निळ्या पिशवीत पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळले. यामध्ये फक्त हात आणि पाय आढळून आले आहेत. तर बाकीचे शरीर आणि शीर इतर ठिकाणी आरोपीने टाकले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. 


पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी एपीएमसी पोलीस डॉग स्कॉड यांच्याकडून तपास करण्यात येतोय. पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? त्याचीदेखील शहानिशा पोलीस करत आहेत.


इतर बातम्या