Coronavirus Update in Mumbai : कोरोना विषाणू(Corona) आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) वाढता संसर्ग पाहता एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दरही 10 टक्क्यांनी कमी झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11 हजार 647 नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचे 34 हजार 433 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


दुसरीकडे, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 980 इतकी आहे. हा आकडा देखील महत्त्वाचा आहे कारण जे नवीन रुग्ण समोर आले आहेत, त्यापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णांच्या 7283 खाटा भरल्या आहेत. तर 36,573 रुग्णालयातील खाटा रिक्त आहेत. मंगळवारी 851 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर, शहराचा कोरोना रिकव्हरी रेट सध्या 87 टक्के आहे.


कोरोनाविरुद्धच्या युद्धात मुंबई महानगरपालिकेचा खर्च जवळपास तीन हजार कोटींवर पोहोचला आहे. पालिकेने पुन्हा एकदा आकस्मिकता निधीतून 300 कोटी रुपये काढण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यापूर्वी आकस्मिकता निधीतून 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2021 पर्यंत मुंबई पालिकेने यासाठी 2 हजार 300 कोटी रुपये खर्च केले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या खर्चामध्ये नागरिकांच्या चाचण्या, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था, नवीन जम्बो कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर, वॉर्ड वॉर रूम, डॉक्टर, परिचारिका आणि बाहेरून येणाऱ्या औषधांचा खर्च समाविष्ट आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha