Covid19 update in India : देशात कोरोनातील कोरोना संसर्गाचा अनियंत्रित वेग आणि ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) चा वाढता प्रसार पाहता केंद्र सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. आरोग्य सचिवांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, देशातील सर्व कृत्रिम ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट (PSA Plant) योग्य पद्धतीने काम करत आहेत, याचीही खात्री करण्यास सांगितले आहे.
आरोग्य सचिवांनी राज्यांना सूचना देत रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व्यवस्थित काम करत आहेत, आयसीयू (ICU), बीआयपीएपी (BIPAP), एसपीओ 2 (SPO2) प्रणालीसाठी आवश्यक व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोनारुग्ण आढळले असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के इतका आहे. शिवाय, देशातील ओमायक्रॉनचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases in India : तिसरी लाट धडकली? गेल्या 24 तासातील नव्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळ
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल
- PM Modi : पंतप्रधान मोदी करणार 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन, तामिळनाडूला मिळणार 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha