Coronavirus Cases in India : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोनारुग्ण आढळले असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के इतका आहे. शिवाय, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) चा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.






 


कोरोना महामारीमुळे देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 84 हजार 655 जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या या वेगात लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत 153 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, भारतात सोमवारपासून 60 वर्षांवरील व्यक्ती आणि इतर आजारांनी ग्रस्त आरोग्य कर्मचारी तसेच आघाडीवर असलेल्या 18 कामगारांना कोविड-19 विरोधी लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून दोन दिवसात 52 हजार 611 लोकांना बूस्टर डोस देण्यात आला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना 2 कोटी 81 लाख 780 डोस देण्यात आले आहेत.


आतापर्यंत 153 कोटींहून अधिक लसीचे डोस दिले


कोरोनाच्या या वेगात लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत 153 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी, देशात अँटी-कोविड लसीचे 76,68,282 डोस देण्यात आले, ज्यामध्ये देशात आतापर्यंत लसीचे 1537 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha