एक्स्प्लोर

Ranichi Baug : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं बारसं; आता 'या' नावांनी ओळखले जाणार पेंग्विन

प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेशासाठी तिकिट रांग न लावता घरबसल्‍या ऑनलाईन पद्धतीने तिकिट घेता यावे याकरता ऑनलाईन तिकिट प्रणालीचे लोकार्पण करण्‍यात आले.

मुंबई : मुंबईत राणीच्या बागेत (Ranichi Baug)आता तीन नव्या पेंग्विनचा (Penguin) जन्म झाला आहे. या नव्या पेंग्विन पिलांची नावं फ्लॅश, बिंगो आणि अॅलेक्सा अशी ठेवण्यात आली आहेत. या नव्या पिल्लांच्या आगमनासह राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विनची संख्या 12 वर पोहोचले आहे. राणीच्या बागेला यंदा 160 वर्ष पूर्ण होतायत आणि त्याच वर्षी तीन नव्या पेंग्विन पिल्लांचं आगमन झाल्यानं बागेच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्राणी संग्रहालयात अलीकडे हम्‍बोल्‍ट पेंग्‍वीनच्‍या तीन नव्‍या पिलांचा जन्म झाला आहे. त्‍यांचे नामकरण देखील जाहीर करण्यात आले आहे. या तीन पिलांपैकी दोन नर एक मादी आहे.  फ्लॅश FLASH (नर  2 एप्रिल 2022),   बिंगो BINGO (नर  26 एप्रिल 2022 ) आणि अॅलेक्‍सा ALEXA (मादी, 9 ऑगस्ट 2022)  अशी ही नावे आहेत.

19 नोव्हेंबर 1862 रोजी भायखळा येथे उद्यान सुरू करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्‍यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्‍वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणी संग्रहालय जनसामान्‍यांच्‍या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेशासाठी तिकिट रांग न लावता घरबसल्‍या ऑनलाईन पद्धतीने तिकिट घेता यावे याकरता ऑनलाईन तिकिट प्रणालीचे लोकार्पण करण्‍यात आले. त्‍यादृष्‍टीने पर्यटकांना अवगत करण्‍यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोड प्रदर्शित करण्‍यात येत आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Embed widget