मुंबई : नालासोपाऱ्यातील एका तरुणाने, भीक मागून आपलं जीवन जगणाऱ्या दोघां चिमुरडयांच पुष्पक विमानाचं स्वप्न साकार केलयं. त्यांन दोन चिमुरड्यांना स्व-खर्चाने हॅलिकॉप्टरची सफर घडवली आहे. यश माने असं त्या तरुणाचं नाव असून, त्याने यापूर्वीही गरीब मुलांना स्व-खर्चाने हॅलिकॉप्टरची सफर घडवली आहे.  


'ए दादा, आम्हाला कधी मिळणार रे ते हवेत उडणारे हेलिकॉप्टर, विमान काय ते म्हणतात, त्यात बसायला..? आम्हाला कोण बसवणार रे त्यात?' त्या दोन चिमुरड्यांचं ऐवढंच बोल ऐकूण नालासोपारा पश्चिमेला राहणाऱ्या यश मानेचे डोळे पाणावले आणि त्यांने त्या दोघांना हॅलिकॉप्टर मध्ये बसवण्याच प्रॉमिस केलं. ते सत्यात उतरवण्यासाठी त्याने चक्क आपल्या स्वतःच्या पैशाने या दोघा चिमुरड्यांना हॅलिकॉप्टरची सफर घडवली आहे.  


नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारी या दोन मुलाची नावं आहेत, रवी वेलपट्टी (वय 6) आणि अंजली मोडेम (वय 7). ही मुलं स्टेशन जवळच्या फुटपाथवर राहतात. या चिमुरड्यांचं हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यास मिळावं हे स्वप्न होतं आणि ते यश माने या तरुणाने स्व-खर्चाने पूर्ण केलं आहे. हॅलिकॉप्टरमध्ये बसायला मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या दोघां चिमुरड्यांना 14 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मुंबईच्या विलेपार्ले येथून मुंबईसह वसई-विरार, ठाणे या परिसराचे दर्शन हेलिकॉप्टर मधून घडवलं आहे.


आयुष्यात प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते. एक वेळच जेवण मिळण्यासाठी धडपडणाऱ्यांना आपली ही इच्छा पूर्ण होईल हे स्वप्नात देखील वाटलं नसेल. मात्र माने याने त्यांच स्वप्न साकार केलं. माने हा मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करतो. गरीब मुलांच्या हेलिकॅप्टर स्वारीचे त्याच हे सहावं वर्ष आहे. दर वर्षी तो अशाच मुलांना आपल्या स्व-खर्चाने हेलिकॅप्टर स्वारी घडवून आणतो.


महत्वाच्या बातम्या :