अकोला : काल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव यांनी केंद्र सरकार देशाचं संविधान बदलवू पहात असल्याचा आरोप केला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांचं समर्थन केलंय. आंबेडकर आज अकोला येथे धमचक्र प्रवर्तन दिनाच्या ऑनलाईन सभेत बोलत होतेय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिने राजकारणापासून दुर असलेल्या आंबेडकरांचा हा पहिलाच राजकीय कार्यक्रम होताय.
ते पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, देशात नवीन संविधान आल्यानंतर येण्याऱ्या हुकूमशाहीला आपण तोंड देवू शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी जागृत असायला हवं असं आंबेडकर म्हणाले. देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देशात होणाऱ्या घटना कल्पनाशक्तीच्या बाहेर राहतील अशी भिती यावेळी आंबेडकरांनी व्यक्त केलीय. कार्यकर्त्यांनी मोदींच्या या संभाव्य पवित्र्यासंदर्भात सजग असणं आवश्यक आहे.
मागच्या आठवड्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात केलेला बंद तोंडदेखलेपणा आणि देखावा असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केलाय. केंद्राने केलेल्या कायद्याचे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीने 2005-06 मध्ये केलेल्या कायद्यात असल्याचा दावा यावेळी आंबेडकरांनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कसं कमी झालं असा सवाल आंबेडकरांनी केलाय. सध्याच्या ओबीसी प्रश्नावर लढणाऱ्या नेत्यांना आंबेडकरांनी 'गाढवांची' उपमा दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.