मुंबई : देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे तब्बल 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार खासगी बँकांचाही समावेश आहे.


मुंबई महापालिकेच्या अर्थ विभागाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या रक्कमेच्या केवळ व्याजापोटी मुंबई महापालिकेला तब्बल 4500 कोटी रुपये मिळतात. महापालिकेने ही रक्कम 1 कोटी 20 लाख मुंबईकरांना वाटली तर प्रत्येक करदाताच्या वाट्याला 51, 250 रुपये येतील.

महापालिकेच्या 61, 510 कोटी जमा रकमेमध्ये भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती निधी 10,455 कोटी, अतिरिक्त निधी 10,927 कोटी आणि नागरी विशेष निधी 34,258 कोटी रुपयांचा समावेश आहे.

जकात करातून मुंबई महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. जकात करातून दिवसाला 12 कोटींची कमाई होते.

त्यामुळे एकीकडे मुंबईत रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत सोयींचा अभाव असताना मुंबई महापालिकेचा अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा बँकेत कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

4500 कोटींमध्ये काय काय शक्य आहे?

प्रत्येक करदात्या मुंबईकराला वार्षिक 51 हजार मिळतील

मुंबई मतदारांना वितरित केले तर प्रत्येकाला 4-5 हजार रुपये मिळतील

शिवराय, बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं राहील

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाखांची 45 हजार घरं मिळतील

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली लागेलट

घाटकोपर ते वर्सोवा या अंतराचा एखादा मेट्रो प्रकल्प उभा राहील

दरम्यान, यासंदर्भात मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर भाष्य केलं आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/841871873340264448

https://twitter.com/ShelarAshish/status/841871798601973760

https://twitter.com/ShelarAshish/status/841871712681615361