एक्स्प्लोर

दुसऱ्या टप्प्यातील मोनो आजपासून रुळावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पहिल्या टप्प्यातली स्थानकं ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनो अखेर आजपासून रुळावर येणार आहे.  वडाळा ते सातरस्ता असा 12 किलोमीटरचा मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होतोय. वडाळा डेपो इथं मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, मोनोरेल्वेच्या या पहिल्या टप्प्यातच मोनो रेल्वे फेल गेली. पहिल्या टप्प्यातली स्थानकं ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू आहे. मोनोला दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम 15 हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर, दिवसाला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो. मात्र, हा पहिल्या टप्प्यात होणारा तोटा आता दुसऱ्या टप्प्यात भरुन निघण्याची आशा आहे. दुसरा टप्पा वर्दळीचा, वडाळा ते सातरस्ता महत्वाची स्थानकं कारण, दुसरा टप्पा हा लोअर परळ, नायगाव, दादर, अँटॉप हिल, जीटीबीनगर या वर्दळीच्या भागातून जातो. त्यामुळे मोनो जास्त प्रवाशांना आकर्षिक करेल, अशी आशा आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. म्हणजे सध्याच्या सातपट प्रवासी संख्या असेल.  तसंच, तिकीट दर सुद्धा मोनोला फायदा मिळवून देणारा असेल. वडाळा ते जेकब सर्कल या सलग टप्प्यात हाच दर 10, 20, 30 आणि 40 रुपये असा असेल. दुसऱ्या टप्प्यातील स्थानके संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जीटीबीनगर. मोनोरेल्वे खरंतर खूप गाजावाजा करुन सुरु करण्यात आली, मात्र पहिल्यापासूनच मोनोरेल्वेला प्रवाशांची पसंती लाभली नाही. मोनोरेल्वेत अनेकदा तांत्रिक बिघाड झाले 2017 मध्ये तर मोनोला आग लागली. नादुरुस्त गाड्यांमुळे अनेकदा मोनो मध्येच ठप्प झाली. व्यवस्थापन करणाऱ्या स्कोमी या कंपनीसोबत एमएमआरडीए प्राधिकरणाचे वाद झाले. डिसेंबर महिन्यात मोनो रेल्वे प्रकल्पामधून मलेशियन कंपनी स्कोमीला हद्दपार करण्यात आले. मोनोरेल्वेचा  दुसरा टप्पा सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या. अखेर आज याला मुहुर्त मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget