एक्स्प्लोर

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी मनसेची तक्रार

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात विजबिल प्रकरणी फसवणूक केल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. अशा प्रकारची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट देखील घेण्यात आली होती. त्यावेळी लवकरात लवकर निर्णय घेऊ अशा प्रकारचा आश्वासन देखील देण्यात आले होतं. परंतु, कुठल्याही प्रकारचा आश्‍वासन पूर्ण न झाल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नितीन राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत बोलताना मनसे माहीम विधानसभेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार म्हणाले की आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह बेस्ट कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी राज्यभरातून विविध पोलिस ठाण्यात दाखल होणार आहेत. 1 ऑगस्ट 2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने वाढीव वीज बिलाबाबत नितीन राऊत यांची भेट घेतली होती. त्यावेळी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून वीज बिलामध्ये सवलत देण्यासाठी अनुदानाची मागणी करणार आणि वाढीव बिलामध्ये सूट दिली जाणार असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर 19 ऑगस्ट 2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन आवाजवी वीज बिलांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. 26 सप्टेंबर 2020 ला मनसेच्या शिष्टमंडळाने ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांची भेट घेतली होती.

ऊर्जामंत्री आणि बेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार बैठकीमध्ये त्यांना महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडून 9 मे 2020 रोजी सर्व वीज कंपन्यांना प्रॅक्टिस डायरेक्शनद्वारे ग्राहकांना कोव्हिडं-19 लॉकडाऊन कालावधीमधील वीज देयकाबाबत केलेले स्पष्टीकरण निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु, त्यावेळी ऊर्जामंत्री कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे ज्यावेळी ऊर्जामंत्री कार्यालयात रुजू होतील. त्यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे शिष्टमंडळ आणि सर्व वीज कंपनीचे प्रमुख यांची याविषयी संयुक्त बैठक घेऊ असं आश्वासन असीम गुप्ता यांनी दिलं होतं. परंतु, तसं काहीच घडलं नाही. त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी राज्यातील जनतेला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वीज बिलामध्ये सवलत देऊन दिवाळीची गोड भेट देऊ असे संकेत दिले होते. परंतु, हेदेखील घडलं नाही. त्यामुळे वरील घटनाक्रम पाहता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर उर्जामंत्री आणि बेस्ट कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोहचवणे अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आज राज्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतील, असंही सांगण्यात आलं आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IPS Promotion DGP : मुंबई अन् ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना मोठं प्रमोशन! देवेन भारती, आशुतोष डुंबरे आता थेट 'DGP'!
मुंबई अन् ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना मोठं प्रमोशन! देवेन भारती, आशुतोष डुंबरे आता थेट 'DGP'
Ravindra Chavan On Rahul Gandhi : 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget