मुंबई : नवरात्र (Navratri) उत्सवासाठी मेट्रो (Metro) मार्ग 2 अ आणि 7 वर 14 अतिरिक्त फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम आणि गुंदवली दरम्यान शेटवची मेट्रो ही रात्री 10.30 ऐवजी रात्री 12.20 ला धावेल.  त्यामुळे नवरात्र उत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत आरामदायक आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. नवरात्र उत्सवामध्ये गरब्याचा आनंद लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत असतात. याच काळामध्ये नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. पण त्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. 


नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मेट मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 या स्थानकांवरुन शेवटची मेट्रो ही रात्री 12.20 ला धावणार आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यास सोपं होईल. आतापर्यंत या मेट्रोमुळे सुमारे पाच कोटी नागरिकांनी या मेट्रोमधून प्रवास केला आहे. 


कशी असेल ही अतिरिक्त सेवा


नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजे 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुमारे 15 मिनिटांच्या  अंतराने एकूण 14 अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सध्या  मेट्रो मार्ग  2 अ आणि 7 या मार्गांवर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 5.55 ते रात्री 10.30 या कालावधी सुमारे 253 इतक्या फेऱ्या होतात. तर या फेऱ्या दर दहा मिनिटांनी धावत असतात. तसेच शनिवारी याच मेट्रोच्या 238 आणि रविवारी 205 इतक्या फेऱ्या असतात. या फेऱ्या दर साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरु असतात. 


नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये 15 मिनिटांच्या फरकाने या अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग 2 अ येथील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग 7 वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो रात्री 1.30 वाजता पोहचेल. दरम्यान सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये एकूण 267 फेऱ्या होतील. तर शनिवार आणि रविवारी या फेऱ्या 252 इतक्या होतील. 


नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये मुंबईकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी गरब्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. पण रात्री उशीरा हे कार्यक्रम संपत असल्याने प्रवास करण्यास मुंबईकरांना अडचण निर्माण होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीएकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर यामुळे गरब्यानंतर अगदी आरामदायी आणि सुखकर प्रवास करण्यास प्रवाश्यांना मदत होणार आहे. 


हेही वाचा : 


Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलचा कारागृहातील कैदी म्हणून नावालाच शेरा, मात्र गावभर मारतोय फेरा; पोलीस, ससून व्यवस्थापन अन् राजकीय नेत्यांवर संशयाची सुई