मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)  5.68 कोटी रुपयांचे कोकेन (Drugs) जप्त करण्यात आले आहेत. याच प्रकरणात तीन विदेशी महिलांना डिआरआयने अटक केलीये. पोलिसांनी एकूण 568 ग्रॅमचे कोकेन जप्त केले. तर यामध्ये दोन युगांडा आणि एका टांझानियाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. सॅनिटरी पॅडमधून या अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत होती. दरम्यान पहिल्यांदाच अशा प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना जरा अडचण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. 


परंतु अत्यंत सावधपणे आणि योग्य नियोजन करुन  डिआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर या तिन्ही महिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय. मुंबईत सध्या विविध ठिकाणांहून अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. तर याच पार्श्वभूमीवर अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. 


मुंबईत झालेली अंमली पदार्थांविरोधात कारवाई


यामध्ये तीन महत्त्वाच्या प्ररकरणाबाबत माहिती देण्यात आलीये. एका नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. तपासादरम्यान तो नायजेरियामध्येही एका ड्रग्स केस मध्ये पकडला गेल्याची माहिती समोर आली. पण त्यानंतर काही वर्षांनी त्याची सुटका झाली. तर मुदत संपूनही तो भारतात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर काही आंतरराष्ट्रीय तस्कर हे मुंबईत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतलं. त्यांना मुंबईतील खेतवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. या लोकांकडून पाच किलोचे 20 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 


काही अनधिकृत लॅब पुण्यात शिरुर या ठिकाणी चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. इथूनच ही औषधं  तेलंगना  आणि इतर भागात पाठवली जात असल्याचं समोर आलं. यामध्ये पोलिसांनी 200 किलो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. तर यातून देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. 


काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्याला केली होती अटक


पोलीस हवालदार नाईक याला आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटवर पकडण्यात आले. त्यावेळी त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करुन त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच्याकडून सुमारे आठ कॅप्सूल सापडले. या कॅप्सूल आरोपी नाईकला हे ड्रग्ज राहुल नावाच्या कैद्याने होते. तर हे कॅप्सून त्याने नाईक याला  अतिसुरक्षा सर्कल 02 मधील आरोपी राशीद याला देण्यासाठी सांंगितले होते. पण त्याचवेळी त्याला कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला अटक केली. त्यावेळी हवालदार नाईक याने त्याला तपासणाऱ्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य गेटवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. 


हेही वाचा : 


Pune: ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणी सरकारला अखेर जाग, ललित पाटील कसा पळाला याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत