एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेला जीएसटीतून वगळा, महापौर आंबेकरांची मागणी
मुंबई : मुंबईचं देशातील आर्थिक स्थान आणि महत्त्व लक्षात घेता महापालिकेला जीएसटीमधून वगळण्यात यावं अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली आहे. शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचंही आंबेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या परिषदेला राज्यभरातल्या महापालिकांचे महापौर उपस्थित होते. तसेच शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना योग्य प्रशासकीय अधिकार देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि त्यास परिषदेच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.
वस्तू आणि सेवा कर लागू केले तर सरकारकडून अनुदान मिळण्यास विलंब होईल. याचा परिणाम म्हणून मुंबई महानगरपालिकेनं नियोजित केलेले प्रकल्प आणि योजना राबवण्यास विलंब होईल असं महापौर आंबेकर यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement