एक्स्प्लोर
Advertisement
मीरा रोड बनावट कॉल सेंटर प्रकरणी मास्टरमाईंडला बेड्या
मुंबई : मीरा रोडमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणाच्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत.
मीरा रोडमधल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर 4 ऑक्टोबर 2016 च्या रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली होती.
देशातील सर्वात मोठी कारवाई!
या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करुन टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवलं जात असल्याचा आरोप आहे. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या अकाऊंटची गोपनीय माहिती गोळा करुन त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर्समधून चालत होते. याच आरोपाखाली मीरा रोडच्या एकूण तीन कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.
या बोगस कॉल सेंटरमध्ये नेमकं काय काम करायचे?
मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून 7 कॉल सेंटर चालवले जात होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी लोकांना फोन करुन इन्श्योरन्स पॉलिसी विक्री, सरेंडर करुन रक्कम परत देण्याचं आमिष दाखवत पैसे गोळा करत असत किंवा बँक अकाऊंटची माहिती मिळवून पैसे लंपास करत असत. लोकांच्या अकाऊंटवरुन ऑनलाईन शॉपिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कॉल सेंटरवरुन इन्कम टॅक्स गोळा करण्याची धमकी देऊन पैशांची वसुलीही केली जायची.
संबंधित बातम्या :
मीरा रोडमधील 7 बोगस कॉल सेंटरवर छापा, 700 हून अधिक जण ताब्यात
मीरा रोड बनावट कॉलसेंटर, 61 भारतीयांवर अमेरिकेत गुन्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement