एक्स्प्लोर

Mumbai Marathon : इथियोपियाचा सॉलोमन डेक्सिसा विजेता

अमॅच्युअर फुल मॅरेथॉन, एलिट मॅरेथॉन या शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या.

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा इथियोपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये सैन्य दलातील धावपटूंनी, तर महिला गटात नाशिकच्या मराठमोळ्या मुलींनी बाजी मारली. हाफ मॅरेथॉनमध्ये एकूण तिघा मराठी धावपटूंनी आपला ठसा उमटवला. जानेवारी महिन्याचा तिसरा रविवार आणि मुंबई मॅरेथॉन हे समीकरण ठरलेलं आहे. सलग अकराव्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीनं आज टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. हौशी धावपटूंच्या मॅरेथॉन (अमॅच्युअर फुल मॅरेथॉन) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तर एलिट मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील नामवंत धावपटूही सहभागी झाले. या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली. सैन्यदलाचा ठसा अर्धमॅरेथॉन शर्यतीत सैन्यदलाच्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला. प्रदीपकुमारसिंग चौधरी अर्धमॅरेथॉनचा विजेता ठरला. दुसऱ्या स्थानावर शंकरपाल थापा असून मराठमोळा धावपटू दीपक कुंभारने तिसरा क्रमांक मिळवला आहे. दीपक हा मूळ कोल्हापूरचा धावपटू आहे. नाशिकच्या मराठी मुलींची बाजी महिला अर्धमॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मराठमोळ्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं. संजीवनी जाधवने पहिला, तर मोनिका आथरेने दुसरा क्रमांक पटकावला. इथियोपियन धावपटूंचं पुन्हा वर्चस्व इथियोपियाचा सॉलोमन डेक्सिसा मुंबई मॅरेथॉन (एलिट मॅरेथॉन) चा विजेता ठरला. त्याने दोन तास 9 मिनिटं 33 सेकंदात शर्यत पूर्ण केली. इथिओपियाचा शुमेट अकालन्यू दुसरा, तर केनियाचा जोशुका किपकोरि तिसरा आला. महिलांमध्येही इथियोपियाची अमानी गोबेना विजेती ठरली, तर केनियाची बोर्नेस किटूर दुसरी आणि इथियोपियाची शुको जेनेमो तिसरी आली. एलिट मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांमध्ये गोपी थोनाकलने विजेतेपद पटकावलं, तर नितेंद्रसिंह रावत द्वितीय क्रमांकावर आला. भारतीय महिलांमध्ये सुधा सिंगने जेतेपद मिळवलं, तर ज्योती गवते दुसरी आली. विजेत्यांची यादी एलिट मॅरेथॉन (पुरुष) प्रथम : सॉलोमन डेक्सिसा (इथियोपिया) 2 तास 9 मिनिटं 34 सेकंद द्वितीय : शुमेट अकालन्यू (इथियोपिया) 2 तास 10 मिनिटं 01 सेकंद तृतीय : जोशुका किपकोरि (केनिया) 2 तास 10 मिनिटं 30 सेकंद एलिट मॅरेथॉन (महिला) प्रथम : अमानी गोबेना (इथियोपिया) 2 तास 25 मिनिटं 50 सेकंद द्वितीय : बोर्नेस किटूर (केनिया) 2 तास 28 मिनिटं 48 सेकंद तृतीय : शुको जेनेमो (इथियोपिया) 2 तास 29 मिनिटं 42 सेकंद एलिट मॅरेथॉन (भारतीय पुरुष) प्रथम : गोपी थोनाकल द्वितीय : नितेंद्रसिंह रावत तृतीय : स्रीनू बुगथा एलिट मॅरेथॉन (भारतीय महिला) प्रथम : सुधा सिंग - 2 तास 48 मिनिटं 32 सेकंद द्वितीय : ज्योती गवते - 2 तास 50 मिनिटं 47 सेकंद तृतीय : पारुल चौधरी - 2 तास 53 मिनिटं 26 सेकंद हाफ मॅरेथॉन (पुरुष) प्रथम : प्रदीपकुमारसिंग चौधरी द्वितीय : शंकरपाल थापा तृतीय : दीपक कुंभार हाफ मॅरेथॉन (महिला) प्रथम : संजीवनी जाधव द्वितीय : मोनिका आथरे

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
Embed widget