एक्स्प्लोर
बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!
भायखळ्यातील जिजामाता उद्यानाजवळ शिवसेनेने उभारलेलं मराठा क्रांती मोर्चाचं पोस्टर फाडण्यात आलं.

मुंबई: भायखळ्यातील जिजामाता उद्यानाजवळ शिवसेनेने उभारलेलं मराठा क्रांती मोर्चाचं पोस्टर फाडण्यात आलं. मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आली. राजकारण न करण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत. 'मोर्चात यायचं असेल तर मराठा म्हणून या, नेता किंवा राजकारणी म्हणून नको, अशा सूचना मोर्चेकरी देत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा मोर्चात राजकारण्यांना सगळ्यात शेवटी स्थान होतं. तसंच कोणत्याही राजकीय व्यक्तीला या मोर्चात भाषण करण्यास मनाई होती. तीच आचारसंहिता मुंबई मोर्चातही लागू असेल, असं आयोजकांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत मराठा मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पोस्टर्सना विरोध करण्यात येत आहे.
Before You Go
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!






















