एक्स्प्लोर

दादरमध्ये झाड अंगावर पडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दिनेश सांगळे काल दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाड कोसळलं.

मुंबई: अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील दादरमध्ये घडली आहे. दिनेश सांगळे असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. दिनेश सांगळे काल दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिनेश सांगळे हे दुपारच्या जेवणासाठी आले होते. ते फुटपाथवरुन चालत असताना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालाय परिसरात, त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश सांगळे हे नायगाव कामगार वसाहतीत रहात होते. काही दिवसांपूर्वीच चेंबूरमध्येही अशाच घटना घडल्या होत्या. जुलै 2017 मध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या अंगावर झाड पडून, तिचा मृत्यू झाला होता. चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन रघुनाथ या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसलेल्या शारदा सहदेव घोडेस्वार (45) यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. झाड पडून मृत्यू झालेल्या घटना
  • 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू
  • 23 जुलै 2017 – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू
  • 7 डिसेंबर 2017 – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू
  • 19 एप्रिल 2018 – दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू
संबंधित बातम्या

मुंबई पालिकेच्या हलगर्जीमुळे दूरदर्शनच्या माजी निवेदिकेचा बळी?

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात,मराठा विद्यार्थ्यांना दिलासा
सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात
CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPA सोबत वेतन करार, वेतनात भरघोस वाढ, बोनसही मिळणार
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPA सोबत वेतन करार, वेतनात भरघोस वाढ, बोनसही मिळणार

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget