मुंबई : धावत्या लोकलसमोर उडी मारुन विरारमध्ये 25 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केली. गर्भवती पत्नी सोडून गेल्यामुळे जीव देत असल्याचं अमित पोकरने आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं.


वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेली अमितची पत्नी 9 मार्चपासून बेपत्ता आहे.

अमित विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये आई-वडिलांसह राहत होता. आत्महत्येपूर्वी त्याने चार मिनिटांचा व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओत त्याने पालक आणि मित्रमंडळींची माफी मागितली.

गर्भवती पत्नीला पळून जाण्याची गरज का वाटली, याचं कारण समजत नाही. तिच्या माहेरच्या मंडळींसोबत आपण तिच्या वर्तनाविषयी बोललो होतो, असं सांगत आपलं आयुष्य संपवत असल्याचं अमित म्हणाला.