एक्स्प्लोर

झोपमोड झाल्याने लोकल ट्रेन रुळांवरुन पाडण्याचा प्रयत्न, मुंबईत माथेफिरुला अटक

झोप मोड झाल्यामुळे थेट लोकल ट्रेन रुळावरुन पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलच्या चाकात लोखंडी रॉड फेकून लोकलवर राग काढला.

मुंबई : केवळ झोप मोड झाल्यामुळे थेट लोकल ट्रेन रुळावरुन पाडायचे प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरुला पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अनिल वाघेला असे त्याचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलच्या चाकात लोखंडी रॉड फेकून अनिलने लोकलवर आपला राग काढला.

अनिल वाघेला हा बेघर तरुण रोज चर्नी रोड स्टेशनच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्नी रोड स्टेशनजवळ पादचारी पूल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. या कामामुळे अनिलची झोपमोड होत होती. सतत दहा दिवस झोप मोड झाल्याने मागील शनिवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी एक लोकल चर्नी रोड स्टेशनवरुन जात असताना या माथेफिरुने रस्त्यावर पडलेला तीन फुटांचा लोखंडी रॉड लोकलच्या दिशेने भिरकावला. तो रोड लोकलच्या बॅटरी बॉक्समध्ये जाऊन अडकल्याने मोठा आवाज झाला. त्या लोकलच्या अलर्ट मोटरमनने आवाज ऐकून लगेच गाडी थांबवली आणि खाली उतरुन तो रॉड बाजूला केला.

या घटनेची माहिती त्यांनी आरपीएफला दिल्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनिल वाघेला याला अटक केली. अनिलने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला रविवारी (25 ऑक्टोबर) कोर्टासमोर हजर करण्यात आले. अनिल वाघेलावर आयपीसी 427 आणि भारतीय रेल्वे कायदा 150 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget