एक्स्प्लोर
टॅक्सीतून उतरण्यास विलंब, तिघांच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू
टॅक्सीतून उतरण्यास वेळ लावल्यामुळे मुंबईत तीन अल्पवयीन तरुणांनी केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला
![टॅक्सीतून उतरण्यास विलंब, तिघांच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू Mumbai : Man allegedly beaten for delay in getting off from taxi, dies latest update टॅक्सीतून उतरण्यास विलंब, तिघांच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/21131101/Taxi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईत किरकोळ कारणातून झालेल्या हाणामारीत एका प्रवाशाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघा अल्पवयीन तरुणांनी केलेल्या मारहाणीत टॅक्सी प्रवाशाचा मृत्यू झाला.
मुंबईतील चेंबुर भागात टॅक्सी पकडताना हा प्रकार घडला. टॅक्सीतून उतरताना लवकर पैसे दिले नाहीत, म्हणून टॅक्सीत चढण्याची वाट बघणाऱ्या तिघांनी टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाला मारहाण केली.
ही मारहाण इतकी जबरदस्त होती, की सुरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला. मारहाण करणारे तीन आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वच प्रवाशांना घड्याळाच्या काट्यावर धावण्याची सवय लागली आहे. मात्र हे करताना संवेदनशीलता, संयम आणि सोशिकपणा यासारख्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून चालल्या आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)