Mumbai Mahanagar Palikla Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं (BMC Elections) बिगुल वाजण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीमुळं या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. राज्यात भाजपला (BJP) साथ देत शिंदे गटानं (CM Eknath Shinde) सत्ता स्थापन केली. आता भाजप आणि शिंदे गटानं मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Mahanagar Palikla) झेंडा फडकवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वतीनं शिवसेनेवर सातत्यानं टीकास्त्र सोडली जात आहेत. अशातच शिवसेनेकडूनही महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावेळी भाजपनं 'मिशन मुंबई'चा श्रीगणेशा केला. तेव्हापासूनच मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी भाजपकडून सातत्यानं अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या भाजपनं आता मुंबईत आणखी एक अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. भाजपनं 'मंत्री तुमच्या दारी' अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानामध्ये मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईतील सर्व वॉर्डात जनता दरबार घेणार आहेत. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला राबण्याचं जाहीर केलं आहे. मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॅार्डात मंगलप्रभात लोढा जनता दरबार घेणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर थेट जनतेशी जुळवून घेण्यासाठी भाजपनं हा नवा फॅार्म्युला राबण्याची योजना आखलं आहे.
असा आहे मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा मेगाप्लान
गणेशोत्सवा दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपच्या मुंबई महापालिका मिशनचाही श्रीगणेशा झाला. यावेळी अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. तसेच, पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं होतं. अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगाप्लानची माहिती समोर आली होती. यामध्ये 80-30-40 चा फॉर्म्युला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या फॉर्म्युल्याच्या आधारे भाजपनं मुंबई पालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी तयार केलेला हा रोडमॅप अखेरपर्यंत अनेक वळणंही घेऊ शकेल. यात शिंदे गटाला सोबत घेतांना भाजप आणि शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. तसंच गेल्या काही दिवसांतील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतची जवळीक पाहता निवडणुकीतही मनसेला सोबत घेऊन कायम ठेवायची की, नाही याबाबतही भाजपमध्ये अजून निश्चितता नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :