Mahanagar Palika Election 2022 : गणेशोत्सवाचा योग जुळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), भाजप (BJP) आणि मनसेनं (MNS) महापालिका निवडणुकीची एकीकडे तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकांचा रणसंग्राम (Mahanagar Palika Election) दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गणपती दर्शनाच्या (Ganesh Festival) निमित्तानं वेगवेगळे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. या दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा उद्देशही असल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे गणेश दर्शनाच्या (Ganeshotsav 2022) निमित्तानं शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढताना दिसत आहे. नव्या राजकीय गणितांची (Maharashtra Politics) जुळवाजुळव सुरु असताना महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच (Diwali 2022) घेण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. 


राज्यातील महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये? 


मुंबई महानगरपालिकेसह (Mumbai Mahanagar Palika Election 2022) राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका (Mahanagar Palika Election News) नोव्हेंबर (November) महिन्यात होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेती अंतर्गत बंडाळीमुळं ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात डोळ्यांसमोर ठेवून शिंदे फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे. गणपती उत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंत्री आपापल्या जिल्ह्यात दौरा करून जनतेचा कल घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे. 


प्रत्येक मंत्र्यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार असून जनतेचा शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूनं कल दिसला तर नोव्हेंबर मध्येच निवडणुका घेण्यासंदर्भात सरकार आग्रही राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकांच्या आधी शिंदे गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जोरदार प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई महापालिकेची तयारी म्हणून अमित शाहांचा झालेला मुंबईचा दौरा आणि राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर ठाणे नवी मुंबई महापालिकेसाठी काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच मनोमिलन ही निवडणुकांचीच तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 


मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा मेगाप्लान


काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह अनेक गणपती मंडळांमध्ये उपस्थिती लावली. तसेच, भाजपच्या मुंबई महापालिका मिशनचाही श्रीगणेशा झाला. यावेळी अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच संबोधितही केलं. अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगाप्लानची माहिती समोर आली आहे. यामध्ये 80-30-40 चा फॉर्म्युला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारे भाजपनं मुंबई पालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.3


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


BMC Elections 2022 : मुंबई महानगरपालिकेवर भाजपा-शिंदे सेनेचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा