मुंबई : मुंबई मेट्रो आणि इतर शासकीय कामांच्या आड येणारी 159 झाडे तोडण्यास आणि 107 झाडे पुनर्रोपित करण्यास आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. यामुळे मेट्रोची कामे लवकर होतील असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. तर झाडे तोडण्यास आमचा आजही विरोध आहे. मात्र मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेले रस्ते आणि नाल्याच्या कामासाठी झाडे तोडण्यास आम्ही संमत्ती दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संगितले.


मुंबईमध्ये मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रो कामासाठी उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठी नुकतीच झाडे तोडण्यात आली. त्याचे पडसाद उमटले होते. झाडे तोडण्यासाठी आमचा विरोध आहे, असेच शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतरही भाजप आणि इतर सदस्यांच्या जोरावर वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली होती.


मेट्रो स्टेशनबाहेर प्रतितास 2 रुपये दराने भाडेतत्वावर सायकल मिळणार


त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा मेट्रो 2 आणि 7 च्या कामासाठी 159 झाडे तोडण्याची तर 107 झाडे पुनर्रोपित करण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने आज झाडे तोडण्याबाबत शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


पाहा व्हिडीओ : CAG Report | मेट्रो किंवा इतर प्रकल्पांचं टेंडर आमच्या काळात निघालं नाही : देवेंद्र फडणवीस 



वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्याच्या प्रस्तावाचे भाजपाने स्वागत केले आहे. मुंबईच्या विकासाच्या आड येणारी आणि आवश्यक असलेली झाडे तोडली पाहिजेत. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मेट्रोचे काम वेगाने होईल, असे भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी म्हटले आहे.


तर आज झाडे तोडण्यासाठी आलेले प्रस्ताव हे मेट्रो स्टेशनच्या बाजूचे रस्ते आणि नाले आदी कामासाठी होते. त्यामुळे आमचा विरोध मोट्रोच्या कामासाठी नाही. आमचा विरोध झाडे तोडण्याला आहे. आवशयक असतील तितकी झाडे वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळेच झाडे तोडण्यासाठी आलेल्या प्रस्तावामधील झाडांची संख्या कमी झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. पुनर्रोपित झाडांची काळजी पालिका आणि मेट्रोच्या एमएमआरसीएल यांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


संबंधित बातम्या : 


Corona | कोरोनाचा गैरफायदा घेत बोगस सॅनिटायझरची विक्री, मुंबईतून लाखोचं बनावट सॅनिटायझर जप्त


#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली