Mumbai Police : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रॅप करत हटके संदेश दिलाय.


Drunk And Drive : सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्यात मुंबई पोलीस नेहमीच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई पोलीस अनोख्या पद्धतीनं समाजात जागरुकता पसरवण्याचं काम करतात. आणि मुंबई पोलिसांचा हाच अंदाज जनतेच्या पसंतीस उतरतो. 
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना आळा बसण्यासाठी जनजागृती सुरु केलीय. हा संदेश पोहचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी वापरलेली पद्धत सध्या चर्चेचा विषय बनलाय. सोशल मीडियावर सर्वत्र या पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळतायत.



मुंबई पोलिसांनी हिंदी गाण्यांच्या विडंबनातून लोकांना दारू पिऊन गाडी चालवू नका असा सल्ला दिला आहे. याआधीही मुंबई पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी बॉलिवूमधील प्रसिद्ध डॉयलॉगचा वापर करत सोशल मीडियावर अनेक संदेश पोस्ट केले होते. त्यावेळीही पोलिसांची ही शक्कल नागरिकांना चांगलीच आवडली होती आणि त्याचीही जोरदार चर्चा झाली होती.



" data-captioned data-default-framing width="400" height="400" layout="responsive">


यावेळी मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील रॅपर हनी सिंगच्या गाण्याचा वापर करत सोशल मीडियाद्वारे दारू पिऊन गाडी न चालवण्याचा संदेश दिलाय. या फोटोमध्ये 'चार बोतल वोडका' आणि 'मै शराबी' यासारख्या गाण्यांचा वापर केलाय. या गाण्यांचे बोल बदलून दारू पिऊन गाडी न चालवण्याचा संदेश दिलाय. यामध्ये 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का, कार ड्राईव्ह करनेसे मैने खुद को रोका', 'ए गणपत चल कॅब बुला' अशा पोस्ट केल्या आहेत. सध्या पोलिसांच्या या पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


Kangana Ranaut Summoned: कंगना रनौतला दिल्ली विधानसभेकडून समन्स, 6 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश


भारतीय नौदलात 'आयएनएस वेला' पाणबुडीचा समावेश; पाकिस्तान-चीनवर राहणार नजर


Avoid WhatsApp Delta : सावधान! तुम्ही 'ही' चूक करताय? तर तुमचंही WhatsApp अकाऊंट होईल ब्लॉक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha