Mumbai Local:  मध्य रेल्वेची (central railway) मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपुरी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कर्जतहून कल्याणकडे येणारी आणि कल्याणहून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाला आहे.  भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्तर ऑफिसजवळ अप ट्रॅकला खड्डा पडला आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळी मुंबईकडे (mumbai news) कामावर निघालेल्या नोकरदारांना चांगलाचं उशीर होणार आहे.दोन्ही मार्गावर तब्बल अर्धा तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.