Mumbai Local Mega Block Updates: मुंबईकरांनो, उद्या रविवार (5 मार्च) सुट्टीचा दिवस. उद्या सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रवासाचं नियोजन तुम्हाला आजच करावं लागेल. उद्या मुंबई लोकलवर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) आहे. मुंबई लोकलच्या मध्य (Megablock on Central Railway) आणि हार्बर (Megablock on Harbour Railway) मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 4 मार्च 2023, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 


मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार, 5 मार्च 2023 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.


ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 


अप मेल आणि डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन 


12126 पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10-15 मिनिटं उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. 


सर्व अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15  मिनिटं उशिराने पोहोचतील.


शॉर्ट टर्मिनेशन मेमू सेवा


वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. 


दिवा येथून सकाळी 11.30 वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी 11.45 वाजता सुटेल.


कुर्ला - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालवण्यात येतील.


हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.