Cyber Crime Cases in Mumbai: मुंबईत (Mumbai News) 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime Cases) घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 70 टक्के वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत (Legislative Assembly) बोलताना दिली. तसेच, नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त एका वर्षाच्या कालावधीत मुंबईत सायबर (Mumbai Cyber Crime) फसवणुकीची किमान 4,286 प्रकरणं नोंदवण्यात आल्याची माहितीही यावेळी बोलताना फडणवीसांनी दिली. 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Home Minister Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी (3 मार्च) विधान परिषदेत बोलताना सांगितलं की, "2022 मध्ये मुंबईतील सायबर गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 70 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या एका वर्षाच्या कालावधीत मुंबईत सायबर (Mumbai Cyber Crime News) फसवणुकीची किमान 4,286 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत." विधान परिषदेत आमदार भाई गिरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही माहिती दिली.  


उपमुख्यमंत्री म्हणाले की, "नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत पाच विशेष पोलीस ठाणे आहेत. नोव्हेंबर 2022 पर्यंत शहरात क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) 1,294 प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी 37 प्रकरणं सोडवण्यात आली आहेत." 


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितलं की, "या कालावधीत ऑनलाईन खरेदी, क्रिप्टो चलन गुंतवणूक, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश, विमा, गुंतवणूक आणि नोकऱ्यांतील फसवणुकीची 2,216 प्रकरणं नोंदवली गेली आणि त्यापैकी 132 प्रकरणांचा छडा लावण्यात यश आलं आहे." तसेच, नोव्हेंबर 2022 पर्यंत एका वर्षात नोंदवलेल्या 4,268 सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांपैकी केवळ 279 गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 


सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक


सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन प्रकाराचा अवलंब करतात. आता गुन्हेगारांनी चक्क बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड'कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल!