एक्स्प्लोर
खोपोली लोकलमधील गळतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ठाण्याहून खोपोलीला जाणाऱ्या लोकलचं गळकं छत प्रवाशानं कॅमेऱ्यात कैद केलं आहे. लोकलमध्येच मुंबईकरांना मिळणाऱ्या शॉवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मुंबई : कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन, कधी ओव्हर हेड वायर तुटून, तर कधी रुळाला तडे जाऊन मुंबईकरांना मनस्ताप देणारी लोकल सर्वांनाच परिचयाची आहे. पण आता लोकलचं छत देखील गळायला सुरूवात झाल्याचं समोर आलं. ठाण्याहून खोपोलीला जाणाऱ्या लोकलचं गळकं छत प्रवाशानं कॅमेऱ्यात कैद केलं आहे. लोकलमध्येच मुंबईकरांना मिळणाऱ्या शॉवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीड ते लातूर प्रवासातील गळक्या एसटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जबरदस्तीची आंघोळ झाली होती. यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बीड-लातूर मार्गावर प्रवाशांना गळकी बस देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. रावतेंच्या आदेशानंतर बीड विभागाच्या विभाग नियंत्रकांनी संबंधित बसचं सदोष काम करणाऱ्या शि. सा. लहाने आणि उ. आ. राऊत या बस बांधणी (बॉडीफिटर) कर्मचाऱ्यांना त्वरीत निलंबित केलं होतं. तर त्यांचे वरिष्ठ म्हणून काम करणाऱ्या मो.रा. गोरे आणि म. प. लोढा या अनुक्रमे प्रभारक आणि सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक पदावरील अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करून सदोष बस मार्गस्थ केल्याचं आरोपपत्र देऊन खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे. त्यातच आता लोकल ट्रेनलाही गळती लागल्याने रेल्वे प्रशासन कुणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























