Mumbai Local Mega Block Today : मुंबईकरांनो आज रविवारी सुट्टीनिमित्त घराबाहेर पडणार असाल आणि मुंबई लोकलच्या भरवशावर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 11 ते 4 वाजेदरम्यान मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे (Central Line)



  • माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.  

  • ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचेल.

  • सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • डाउन धीमी लाइनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल.

  • ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.33 वाजता सुटेल. 

  • अप धीमी लाइनवर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असून ठाणे येथून दुपारी 04.03 वाजता सुटणार आहे. 


ट्रान्स हार्बर (Trans Harbour Line)



  • सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग

  • ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल ठाणे येथून सकाळी 10.35 वाजता सुटणार आहे.

  • ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी लोकल ठाणे येथून दुपारी 4.19 वाजता सुटणार आहे.

  • अप ट्रान्स हार्बर मार्गावर ठाण्यासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून सकाळी 10.15 वाजता सुटणार आहे. ठाण्यासाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.53 वाजता सुटणार आहे.


पश्चिम रेल्वे (Western Line)



  • माहीम - अंधेरी अप आणि डाउन हार्बर लाईनवर 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

  • माहीम आणि अंधेरी या दोन्ही अप आणि डाऊन हार्बर मार्गावर, 11:00 ते 4:00 वाजेपर्यंत 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणा आहे.

  • या कालावधीत, मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व सीएसएमटी - वांद्रे - सीएसएमटी आणि सीएसएमटी - गोरेगाव - सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा तसेच चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यानच्या काही धीम्या सेवा रद्द केल्या जातील.

  • डाउन हार्बर मार्गावरील वांद्रे ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीवरून सकाळी 10.08 वाजता सुटेल आणि वांद्रे येथे सकाळी 10.37 वाजता पोहोचेल.

  • अप हार्बर मार्गावरील वांद्रे ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वडाळा रोडपर्यंत धावेल, वांद्रे येथून सकाळी 10.45 वाजता सुटेल आणि 11.16 वाजता वडाळा रोडला पोहोचेल.

  • डाउन हार्बर मार्गावरील गोरेगाव ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटीवरून 04.16 वाजता सुटून सायंकाळी 05.10 वाजता गोरेगावला पोहोचेल.

  • अप हार्बर मार्गावरील गोरेगाव ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगावहून दुपारी 04.29 वाजता सुटेल आणि 05.24 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.