एक्स्प्लोर

हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक, थेट 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता संपणार; यादरम्यान कशी असणार रेल्वेसेवा?

Harbour Line Mega Block: मध्यरेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गवर 38 तासांचा मेगाब्लॉक सुरू झाला असून ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेनंतर मार्ग सुरळीत होणार आहे.

38 Hour Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी... हार्बर मार्गावर (Harbour Line) तब्बल 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधली वाहतूक शनिवारी रात्री 11 ते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. काल (शनिवारी) रात्री 9 वाजता सीएसएमटीहून (CSMT) पनवेलसाठी शेवटची लोकल सुटेल, तर सोमवारी दुपारी 12 वाजून आठ मिनिटांनी सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल सुटणार आहे. ब्लॉकदरम्यान ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्ग सुरू राहणार आहे. दरम्यान, आज केवळ हार्बर मार्गावरील जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर मध्यरेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर कोणाताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. 

मुंबईच्या हार्बर मार्गावर काल (शनिवारी) रात्री अकरापासून 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील. तर, 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजल्यानंतर मार्ग सुरळीत होणार आहे. 

रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'च्या कामासाठी हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बरवरील मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेसेवा कशी असेल? 

हार्बरवरील मेगाब्लॉकच्या काळात हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्टेशनपर्यंत चालवल्या जातील. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु राहिल.

दरम्यान हा मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल ट्रेन रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. तर अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 11 वाजून 54 मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. यानंतर लोकल सेवा बंद असणार आहे.

हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही 

हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक असल्याने रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार नाही. याशिवाय पश्चिम रेल्वेवर देखील ब्लॉक नसेल. मागील आठवड्यात रविवारी देखील गणेशोत्सावामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक घेतलेला नव्हता.

दरम्यान, मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget